वनताराची टीम लवकरच सिंधुदुर्गात !

पालकमंत्री नितेश राणेंची माहिती
Edited by: विनायक गांवस
Published on: November 15, 2025 14:09 PM
views 148  views

सावंतवाडी : ओंकार हत्तीला वनताराला पाठविण्यासाठीचे आदेश आहेत. त्यासाठी मी आणि दीपक केसरकर वनताराच्या संपर्कात आहोत. त्यांची टीम दोन वेळा इथे येऊन गेली आहे. आता लवकरच तिसऱ्यांदा जिल्ह्यात येईल, न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेत. वनतारा सारख्या सुरक्षित जागी ओंकार हत्तीला पाठवून जनसामान्यांत जे भितीच वातावरण आहे, शेतकऱ्यांना होणारा त्रास संपुष्टात आणू असे मत पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केले. 

सावंतवाडी येथील भोंसले सैनिक स्कूलच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, बीकेसीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले आदी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, संरक्षण मंत्रालयाच मान्यता प्राप्त भोंसले सैनिक स्कूल सावंतवाडीत उभं राहतं आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाचा क्षण आहे. भविष्यात सैनिकांसह अधिकारी तयार करण्यासाठी ही शाळा म्हत्वाची ठरेल. अच्युत सावंत भोंसले व सहकारी पारदर्शी काम संस्थेच्या माध्यमातून करतात. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच राहूल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. पार्ट टाईम पॉलिटिशीयना बिहारच्या जनतेनं नाकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीएम नितीन कुमार यांना पुन्हा संधी दिली आहे. मुंबईत कॉग्रेसची हिंमत नाही, त्यांना मुंबईवर हिरव्यांच राज्य आणण्यासाठी कार्यक्रम आहे‌. त्यांची भाषा जिहाद्यांची आहे अशीही टीका केली