
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी भाजपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उबाठा शिवसेनेन फोडून दाखवा अस आव्हान दिलं होत. ते स्वीकारत भाजपन उबाठाला मोठा धक्का दिला. मायकल डिसोझा यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते विशाल परब, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, सौ. वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, रणजीत देसाई, राजू राऊळ, संदिप गावडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










