
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मराठी, मालवणी बोलणारा, सर्वसामान्य घरातील आणि जनतेसाठी चोवीस तास वेळ देणारा असणार आहे. येत्या 13 तारीख पर्यंत त्या चेहऱ्यासह सर्व उमेदवार जाहीर करू आम्हाला माहितीची गरज नसून आम्ही स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहोत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज दिली.
येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री परब यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला जिल्हा प्रमुख जिल्हा ॲड. नीता सावंत कविटकर, सहा प्रमुख बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई,अजय गोंदावळे आदी उपस्थित होते. श्री परब पुढे म्हणाले, आमच्या दीपक केसरकर हे सावंतवाडी शहराचे रत्न असून त्याने आत्तापर्यंत शहराच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी या ठिकाणी आणला आहे. त्यांनी कधीच आजपर्यंत या निधीची जाहीर वाचता करून मोठेपणा घेतला नाही. त्यांनी गेल्या वर्षभरात केवळ सावंतवाडी शहरासाठी 16 कोटी रुपये एवढा निधी शहरांमध्ये आणला आहे त्यापैकी काही कामे मार्गी लागली असून काही कामांना मंजुरीही मिळाली आहे. परंतु काही लोक एवढे मोठे शहर असूनही तुटपुजी रक्कम सांगून शहराचा विकास करणार असल्याचे जाहीर करतात हे हास्यास्पद आहे.आमदार केसरकर यांनी गेल्या वर्षभरात शहरातील योगा सेंटरसाठी अडीच कोटी म्युझियम साठी दीड कोटी रुपये मटन मार्केट साठी तीन कोटी, रुपये मोती तलाव नजीकगार्डन विकसित करण्यासाठी दीड कोटी, शहरातील रस्ते व गटार सुशोभीकरण्यासाठी तीन कोटी, शहरातील मोती तलावाच्या फुटपाच्या कामासाठी 60 लाख ओपन प्लेसच्या विकासासाठी 50 लाख समाज मंदिर चाळ दुरुस्तीसाठी 40 लाख आधी साडेसोळा कोटीचा निधी आणला आहे.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी शहरात तील जनता ही सुज्ञ आहे सावंतवाडीचा विकास कोण करणार हे येथील जनतेला माहीत आहे त्यामुळे कोणी कितीही विकासाच्या बाता मारल्या तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही येत्या 13 तारीख पर्यंत आम्ही नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मराठी मालवणी भाषा बोलणारा तसेच सर्वसामान्य जनतेला 24 तास भेटणारा आणि सर्वसामान्य घराण्यातील असा असणार आहे. तसेच आम्हाला या ठिकाणी कुठल्याही महायुतीची गरज नाही आम्ही स्वतत्र निवडणुकीला तयार आहोत.










