
सावंतवाडी : सातुळी बावळाट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच उबाठाचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत सुकी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत व युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश घेण्यात आला.
सातुळी बावळाटचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत सुकी यांनी आज कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत ओरोस भाजपा जिल्हा कार्यालय येथे हा प्रवेश पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी यापुढे सदैव कार्य करत राहू तसेच जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी कायम कटिबद्ध प्रयत्नशील राहू. भाजपा पक्ष हा शिस्तीचा आणि पक्ष संघटनेच्या ध्येय धोरणाशी सदैव एकनिष्ठ असलेला पक्ष आहे. त्यामुळे अशा पक्षामध्ये काम करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असे यावेळी.श्री सुकी म्हणाले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बांदेकर,ॲड.सुमित सुकी, अजिंक्य सुकी, हर्षवर्धन सुकी, प्रसाद सुकी, अमर मोर्ये, केतन उर्फ बंटी अजगावकर, आदिनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, सुधाकर सुकी, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे,गेळे सरपंच सागर ढोकरे, शक्तिकेंद्र प्रमुख भिवा सावंत, ॲड.विठ्ठल परब,केसरी विकास सोसायटी संचालक दिप्तेश सुकी,निहाल शिरसाट,आदि मान्यवर उपस्थित होते तसेच विलवडे पंचायत समिती मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.











