
सावंतवाडी : स्मार्ट मीटर बसविणेस ग्रामसमेया विरोध असल्याबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण (मर्या) वेंगुर्ला यांचे सातार्डा सरपंच यांनी लक्ष वेधले आहे.
सातार्डा ग्रामपंचायतीच्या संदर्भित ग्रामसभेत स्मार्ट मीटर बसविणेस तीव्र विरोध करण्यात आलेला आहे. वीज वितरण कंपनीने सातार्डा गावात स्मार्ट मीटर बसवू नयेत, काही ठिकाणी परवानगी न घेता बसविले स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्या ऐवजी जुने मिटर बसवून द्यावेत अशी ग्रामसभेची मागणी आहे. स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीज बील येत असल्याची भीती ग्रामसभेत व्यक्त केली आहे. त्यामुळे यापुढे सातार्डा गावात स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, गावात बसविलेले स्मार्ट मीटर व काढून त्या ऐवजी जुने वीजमीटर बसवून द्यावेत अशी मागणी केली आहे.










