
सावंतवाडी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडीचे युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांनी भाजपात प्रवेश केला. युवासेनेला हा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी प्रतिक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रतिक बांदेकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी धनशाम जाबरे, आशिष कुलकर्णी, भावेश कुडतरकर, आदित्य सगम, अलफाज मुल्ला, मंथन जाधव यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शक्ती केंद्र प्रमुख अमित गवंडळकर आदी उपस्थित होते.










