बाहेरची माणसं शहरात लावालावी करतात !

....म्हणून भाजप सोडलं : अजय गोंदावळे
Edited by: विनायक गांवस
Published on: October 24, 2025 15:51 PM
views 175  views

सावंतवाडी : भाजपाच शहराध्यक्ष पद साडेचार वर्षे सांभाळल. मात्र, ६ महिन्यात एसटी महामंडळाच असलेलं पद माझा राजीनामा न घेता दुसऱ्याला गेलं. बॅनर दिसल्यावर मला हे लक्षात आलं. अंतर्गत लावालावीची प्रकार काहीजण करत आहे. पक्षात कलह निर्माण करण्यासाठी काही बाहेरची माणसं सावंतवाडी शहरात येत आहे असा जोरदार हल्लाबोल भाजपचे माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केला. शिवसेना पक्षप्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेत्यांचे ऋण व्यक्त करत स्थानिक नेत्यांवर टीकास्त्र सोडले. 

गोंदावळे म्हणाले, शहरात पक्ष सक्षम असताना काही बाहेरील लोक शहरात लुडबुड करत असल्याने कार्यकर्ते दुखावले गेलेत. आम्हालामी त्रास सहन करावा लागत असल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे राजीनामा दिला. माजी मंत्री, आम. दीपक केसरकर, आम. निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली मी यापुढे शिवसेनेच काम करेन अस मत व्यक्त केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, क्लेटस फर्नांडिस, बिट्टू सुकी, संजय वरेरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.