
सावंतवाडी : दिवाळीच्या मंगलमय पर्वात, लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या 'दिपोत्सवाचा' आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून'अभंग रिपोस्ट' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत परंपरेचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्धांसह जेन्झींची उपस्थिती लक्षणीय होती.

भक्ती आणि संगीताच्या या सुंदर मिलाफात सावंतवाडीकर दंग होताना पहायला मिळाले. भर पावसात देखील जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे आयोजित या कार्यक्रमास प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी अभंग रिपोस्टचे कलाकार जॉय रूबडे, यश शिरोडकर, आजय वाव्हळ, प्रतिश म्हस्के, विराज आचार्य, पियुष आचार्य, स्वप्नील तर्पे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी युवा नेते विशाल परब, सौ.वेदीका परब, भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, ॲड अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.










