
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. शंतनू तेंडुलकर यांनी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी औपचारिकपणे कार्यभार स्वीकारला आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्रीपाद पाटील यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप युवा नेते विशाल परब, ॲड. अनिल निरवडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सावंतवाडीतील नागरिकांना आता वैद्यकीय अधिकाऱ्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी मुस्लिम समाजतर्फे सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादीचे अर्शद बेग यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी आपले मत मांडले आहे. रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध झाल्याने स्थानिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवेचा दिलासा मिळणार असून गोवा-बांबोळी येथे रुग्ण पाठविण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी तीन परिचारिकांची नियुक्ती जनसहभागातून करण्यात येणार असल्याची माहिती विशाल परब व ॲड.अनिल निरवडेकर यांनी दिली आहे. या केलेल्या कार्याबद्दल मुस्लिम समाजतर्फे सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले असून,
महायुतीचे राष्ट्रवादीचे अर्शद बेग यांनी आभार मानले आहेत. ही नेमणूक म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासादायक पाऊल आहे. महायुती सरकारच्या जनसेवा दृष्टिकोनाचा हा उत्तम प्रत्यय आहे. या नेमणुकीमुळे सावंतवाडी तालुक्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट होणार असून जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे असे मत व्यक्त केले आहे.










