'अभंग रिपोस्ट'

Edited by: विनायक गांवस
Published on: October 21, 2025 15:30 PM
views 195  views

सावंतवाडी : दिवाळीच्या मंगलमय पर्वात, लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या 'दिपोत्सवाचा' आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या  वतीने 'अभंग रिपोस्ट' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्ती-संगीतमय कार्यक्रम दिवाळीची सायंकाळ अधिक श्रवणीय आणि उत्साहाची करणार आहे. 

भक्ती आणि संगीताच्या या सुंदर मिलाफात सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ८:०० वाजता  जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप युवा नेते विशाल प्रभाकर परब यांची ही संकल्पना असून या भक्तीमय दिवाळीच्या संध्याकाळचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.