
सावंतवाडी : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. डिसेंबर, जानेवारी कालावधीत नगरपालिका निवडणुका होणार असून आज अध्यक्षपदांची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या प्रथम नागरिक पदावर बसण्याची संधी कुणाला मिळते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
आजच्या सोडती नंतर प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे. आज सावंतवाडी नगराध्यक्षपदी कुठले आरक्षण पडते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. त्यामुळे आता आरक्षण सोडतीत कुणाला संधी मिळते याकडे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यावर पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहेत.










