घर तेथे शोषखड्डा अभियान

Edited by: विनायक गांवस
Published on: October 05, 2025 19:42 PM
views 62  views

सावंतवाडी : सध्या संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू असून सेवा पंधरवडा राबवला जात आहे. यालाच अनुसरून स्वच्छता, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा विविध घटकांना आवश्यक असे उपक्रम राबवले जातात. स्वच्छता हि सेवा अंतर्गत घर तेथे शोषखड्डा अभियान शासनाकडून सुरू करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. 

सावंतवाडी तालुक्याची सुरुवात मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मळेवाड माळकरटेंब येथील अनिल नाईक यांच्या घरा शेजारील परसबागेत शोषखड्डा खोदून या अभियानाचा प्रारंभ सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने पुढाकार घेतला आहे.या शुभारंभ प्रसंगी सरपंच मिलन पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,मधुकर जाधव, रोजगार सेवक अमित नाईक, ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत, वैभव मोरुडकर अंगणवाडी सेविका, सी आर पी, ग्रामस्थ,कर्मचारी आदी उपस्थित होते.