उद्या सावंतवाडी शहरात विद्युत पुरवठा बंद

Edited by: विनायक गांवस
Published on: October 05, 2025 16:53 PM
views 293  views

सावंतवाडी : उद्या दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सावंतवाडी शहरास विद्युत पुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीवर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत वाहिनीचे देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी आउटेज घेण्यात येणार आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराचा विद्युत पुरवठा या वेळेत बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे आवाहन महावितरण सावंतवाडीने केलं आहे. काम लवकर झाल्यास विद्युत पुरवठा लवकर चालू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.