मटक्यावर कारवाई ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Edited by: विनायक गांवस
Published on: October 05, 2025 10:48 AM
views 747  views

सावंतवाडी : शहरातील भाजी मार्केटजवळ कल्याण मटका जुगारावर आकडे घेणाऱ्या एका ६६ वर्षीय वृद्धासह आकडे पुढे पुरवठा करत असलेल्या अन्य एका तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.

विजय बाबाजी चव्हाण (वय ६६, रा. उभा बाजार) यांना भाजी मार्केटजवळ अवैधपणे कल्याण मटका जुगाराचे आकडे घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्या तसेच १ हजार ९३० रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. चव्हाण हे घेतलेले हे आकडे अक्षय सावंत, याला पुढे देत होते. त्यानुसार, पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्याखाली विजय चव्हाण आणि अक्षय सावंत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल धुरी, महेश जाधव, श्री. शिंगाडे आणि पवन परब यांच्या पथकाने केली.