
सावंतवाडी : येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या देवी सरस्वतीची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली. मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने देवी विसर्जनसाठी मोती तलाव येथे रवाना झाली.
सरस्वती देवीच्या मूर्तीची शाळेत विधिवत पूजा झाल्यानंतर, आज विसर्जन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांची मिरवणूक आणि शाळेच्या लेझीम पथकाचं खास सादरीकरण लक्षवेधी ठरलं. विविध पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सादर करण्यात आलेल्या एकापेक्षा एक सरस प्रात्यक्षिकांनी नागरिकाचं लक्ष वेधून घेतलं होत










