
सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे सरस्वती पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा राजेशिर्के यांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या निमित्त सकाळ सत्रात कुमारी दुर्वा मोरे व जानवी दिंडे तर दुपार सत्रात कुमारी श्रावणी राठोड, प्रीती घाणेकर व साक्षी गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीतील सरस्वती पूजनाचे महत्त्व, ज्ञानदेवतेचे स्थान तसेच वसंत पंचमीचे महत्व स्पष्ट केले.
शिक्षक मनोगतात शिल्पा राजेशिर्के यांनी सरस्वती पूजन व साडेतीन शक्तीपीठांबाबत सखोल माहिती दिली. दोन्ही सत्रात "ये हंसावरती बसून शारदे" ही प्रार्थना सर्व विद्यार्थ्यांनी गायली. सकाळ सत्राचे सूत्रसंचालन कुमारी गार्गी घडशी (इ.७ वी ब) हिने केले, तर दुपार सत्राचे सूत्रसंचालन कुमारी कोमल पंडित हिने केले.
या कार्यक्रमानिमित्त बोंडला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकाळ सत्रात प्रथम क्रमांक ७ वी ड, द्वितीय क्रमांक ७ वी क यांनी पटकावला. तर दुपार सत्रात प्रथम क्रमांक ८ वी अ, द्वितीय क्रमांक ८ वी ड व तृतीय क्रमांक ९ वी ड यांना मिळाले. आभार प्रदर्शन सकाळ सत्रात कुमारी आर्या चव्हाण हिने व दुपार सत्रात कुमारी प्रेरणा हुमणे हिने केले.कार्यक्रमाची सांगता सरस्वतीची आरती व भजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा कदम व अनुजा बागवे यांनी केले होते. विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उप प्राचार्य विजय चव्हाण यांनी सर्वांचे कौतुक केले. बोंडला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक व सरस्वतीला वंदन करताना उपस्थित विद्यार्थी व शिक्षक










