
सावंतवाडी : सुमारे साडे चारशे वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावच्या प्रसिध्द शाही दसरोत्सवाला बुधवारी १ ऑक्टोबरला प्रारंभ होत असुन दोन दिवस चालणाऱ्या या दसरोत्सवाची सांगता गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा होणार आहे.
या दसरोत्सवास जिल्ह्यासह गोवा, बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते. दसरोत्सवाच्या या सुवर्ण पर्वणीला हजारो भाविक रवळनाथ चरणी लिन होत रवळनाथाचा कृपा आशिर्वाद घेतात. ओटवणे गावचा संस्थानकालीन दसराउत्सव खंडेनवमी आणि विजयादशमी असा दोन दिवस साजरा केला जातो. सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा घातल्यानंतर शिव लग्न सोहळा होऊन, भाविकांनी सोने म्हणून आपट्याची लुटली जाणार आहे.










