सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी सत्कार, शिष्यवृत्ती वितरण आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा, सावंतवाडी नं. 4 येथे पार पडणार आहे. गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षिका श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण धारगावकर,मुख्याध्यापक श्रीमती दक्षता दुर्गराम गवस, उपशिक्षिका, विद्यार्थी पियुष लक्ष्मण जाधव, ईश्वरी शंकर नाईक, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन म्हणून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. यात वीरा राजवी घाडी, मानवी महेश घाडी, पार्थ अशोक बोलके, हार्दिक अशोक वरक, स्वरा गोविंद नेर्लेकर, काव्य अमित तळवणेकर, डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा सत्कार प्रज्ञाशोध परीक्षेत चमकदार कामगिरी करणारा विद्यार्थी हर्ष रवींद्रनाथ गोसावी या सर्व गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून सत्कार करण्यात येणार आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हा सत्कार समारंभ राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष: संतोष तळवणेकर,उपाध्यक्ष: मंगेश माणगावकर, सचिव: रामचंद्र कुडाळकर, सहसचिव: कल्याण कदम,खजिनदार: ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा संपर्कप्रमुख: शिवा गावडे
महिला जिल्हाध्यक्ष : पूजा गावडे
महिला उपाध्यक्ष : पूजा संसुरकर
तालुका अध्यक्ष : संचिता गावडे आणि दर्शना राणे
शहराध्यक्ष : सेजल पेडणेकर यांनी केल आहे. पुरस्कार आणि सत्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.










