
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या 'सेवा पंधरवडा' उपक्रमांतर्गत, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने 'नमो युवा रन' या मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश नशामुक्तीचा संदेश देणे हा होता.
हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, राजू राऊळ, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर यांच्यासह युवा मोर्चाचे आणि भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा मोर्चाने केलेल्या या उत्तम आयोजनामुळे 'सेवा पंधरवडा' उपक्रमाला अधिक बळ मिळाले असून, युवकांमध्ये नशामुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.










