स्वीफ्ट कारसह मद्याचे ६५ बॉक्स जप्त

Edited by: विनायक गांवस
Published on: September 26, 2025 21:28 PM
views 1057  views

सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज घातलेल्या छाप्यात सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव इथं स्वीफ्ट कारसह गोवा बनावटी मद्याचे एकुण ६५ बॉक्स व कार असा एकूण ९ लाख ६२ हजार रु. किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला.

आज रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ क्र.०१ यु.एस. थोरात यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन पंच स्टाफसह  कोलगांव येथे खाजगी वाहनाने जावून छापा घातला असता मारुती सुझुकी कंपनीची करड्या रंगाची चारचाकी स्वीफ्ट कार वाहनमध्ये गोवा बनावटी मद्याचे एकुण ६५ बॉक्स लपवून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले. हा मिळून आलेला दारुबंदी गुन्हयाचा सर्व मुद्देमाल व मारुती सुझुकी कंपनीची करड्या रंगाची चारचाकी स्वीफ्ट कार वाहनसह एकूण ९,६२,०००/- रु. किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमध्ये संशयित इसम राजकुमार चव्हाण, (वय ४६ ) याला जागीच ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मागदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम.एस. गरुड,दुय्यम निरीक्षक यु.एस. थोरात  यांनी केली. या कारवाईमध्ये, श्रीमती ए.ए. वंजारी,  एस.एस. चौधरी,  एस.एम.कदम, एन.पी. राणे, व्ही.एम. कोळेकर, पी.ए. खटाटे, प्रशांत परब, अवधुत सावंत, विजय राऊळ यांचे सहकार्य लाभले. पुढील तपास यु.एस. थोरात  करीत आहेत.