'त्या' विद्यार्थ्यांच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 26, 2025 20:56 PM
views 223  views

सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी राणी पार्वती देवी हायस्कूलच्या  पटांगणात स्केटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत चौकशी केली. नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. राणे आले असता मैदानी खेळाचे धडे घेणाऱ्या या विद्यार्थ्यांसह ते रमताना दिसले.

यावेळी नितेश राणे यांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा तसेच अन्य सर्व सुविधांसाठी पालकमंत्री या नात्याने जी काही मदत करता येईल ही सर्वस्वी मदत आपण करू, असे आश्वासन त्यांनी संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांना दिले. रोलर स्केटिंग, रोल बॉल या क्रीडा प्रकारात हे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. विभाग स्तरावर चार संघ गेले असून भविष्यात रोलर हॉकी संघ निर्माण करण्याचा मनोदय क्रिडा प्रशिक्षकांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री राणेंनी या शिक्षक, विद्यार्थांचे कौतुक केले.