
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्य मानांकन स्पर्धेसाठी संघांची निवड करण्याची सुवर्णसंधी असून जिल्ह्यातील युवा कॅरमपटूंसाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनने कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. ही जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा रविवार, दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. भारत कॅरम क्लब, प्रांत ऑफीस समोर, सावंतवाडी येथे ही स्पर्धा होणार असून स्पर्धेमध्ये खालील चार वयोगटांतील मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. यात
१२ वर्षांखालील मुले व मुली
१४ वर्षांखालील मुले व मुली
१८ वर्षांखालील मुले व मुली
२१ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी नाव नोंदणी अनिवार्य आहे. एन्ट्री फी: रु. १५०/- रजिस्ट्रेशन फी: रु. १००/- असून नाव नोंदणीची अंतिम तारीख शुक्रवार, दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत) आहे. इच्छुक खेळाडूंनी योगेश फणसळकर (मो. क्र. ७६२०७५५७६६) यांच्याकडे आपले नाव व शुल्क जमा करावे. सर्व खेळाडूंनी स्पर्धेत खेळताना पांढरा टी-शर्ट परिधान करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र युवा खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवावे आणि राज्य स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










