राष्ट्रवादी श. प. ला धक्का

वेंगुर्ला पदाधिकाऱ्यांचा पालकमत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
Edited by: विनायक गांवस
Published on: September 26, 2025 17:11 PM
views 271  views

सावंतवाडी : राज्याचे मत्स्ययवसाय व बंदरे  विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुळस पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अवधुत गजानन मराठे व  युवक तालुका अध्यक्ष शुभम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सावंतवाडी येथे पालकमंत्री श्री. राणे यांच्या आढावा बैठकीत हा पक्षप्रवेश पार पडला.

प्रवेशकर्त्यांमध्ये तुळस गाव महिला अध्यक्षा पूनम परब, गाव कमिटी अध्यक्ष अनिल चुडजी, तुळस बुथ अध्यक्ष पंढरीनाथ नाईक, विकास बर्डे, उभादांडा बुथ अध्यक्ष सुहास मोचेमाडकर यांचा समावेश असून पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, प्रमोद कामत, संदीप गावडे, मनोज नाईक, रविंद्र मडगावकर, संतोष राऊळ आदी उपस्थित होते. लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटातील तुळस विभागातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी अवधुत मराठे यांनी दिली.