
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा वार्षिक मेळावा बुधवारी, १ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दीपक केसरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रुपेश पाटकर, माजी पोलीस उपाधीक्षक श्री. दयानंद गवस आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल परब उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ७५ वर्षे पूर्ण (जन्म सन १९५०), ८० वर्षे पूर्ण (जन्म सन १९४५) आणि ९० वर्षे पूर्ण (जन्म सन १९३५) झालेल्या सदस्यांचा विशेष सन्मान केला जाईल. तसेच, ज्या दांपत्यांच्या वैवाहिक जीवनाला ५० वर्षे पूर्ण (विवाह सन १९७५) झाली आहेत, अशा दांपत्यांचाही सत्कार करण्यात येईल.
सर्व सदस्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन यावे आणि आपली नावे २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कळवावीत, असे आवाहन संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर यांनी केले आहे.










