
सावंतवाडी : माजी आरोग्यमंत्री, कै. भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि काँग्रेसचे नेते कै. विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांची शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी विक्रांत सावंत यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री. केसरकर म्हणाले, विक्रांत सावंत हे स्व. भाईसाहेब सावंत व स्व.विकास सावंत यांचा वारसा निश्चितच पुढे घेऊन जातील. माझं सहकार्य त्यांना निश्चितपणे राहील असं मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, राजन म्हापसेकर, संदीप राणे, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.










