मळगांव रेडकरवाडीतील रहिवासी नितीन रेडकर यांचे निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 23, 2025 20:34 PM
views 179  views

सावंतवाडी : मळगांव रेडकरवाडी येथील मूळ रहिवासी नारायण तात्या उर्फ नितीन रेडकर (५८, सध्या रा. आमोणे, केपे - गोवा ) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम केपे व त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखला करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई, भाऊ, चुलत भाऊ,  भावजया, दोन विवाहित बहिणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. पत्रकार सचिन रेडकर यांचे ते चुलत भाऊ होत.