
सावंतवाडी : 'आंबोली पर्यटन' हे फक्त पावसाळी पर्यटन हंगामापुरते मर्यादित 'न' राहता ते आता बारमाही पर्यटनाचा एक आगळा-वेगळा असा 'जागतिक केंद्र'च बनत असून अशी किमया ही स्थानिक युवक निर्णय राऊत आणि त्याच्या 'आंबोली टुरिझम' ह्या संस्थेने केलेली आहे. जगाच्या नकाशावर आंबोली गेल्यापासून ते आजवर आंबोली परिसरात सर्व प्रकारातील पर्यटन हे बारमाही उपलब्ध तर झालेच, सोबत पर्यटन क्षेत्रात आंबोली मोठी झेपच घेत आहे. त्यात आता भर म्हणून आंबोलीचे नैसर्गिक महत्व पाहता विशेष असा आंबोली 'जंगल सर्व्हायव्हल कोर्स' हा उपलब्ध करण्यात आलेला आहे. हा विशेष उपक्रम राज्यातील पहिलाच ठरणार आहे.
निर्णय राऊत'ने स्थापन केलेली 'आंबोली टुरिझम' ही संस्था पर्यटन, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, वन्यजीव संवर्धन आदीत संबंधीत राज्यभर कार्यरत आहे. तर आता इको पर्यटन सह निसर्गाशी एकरूप करणारा आणि प्रत्येकाला शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा तसेच तान - तनावातून मुक्त करत पारंपारिक जीवनशैली आदीशी पूर्णतः निगडीत विशेष असा 'सर्व्हायव्हल कोर्स' हा निर्णय राऊतने त्याच्या 'एनएसए (NSA) अॅकॅडमी' व इंस्टीट्यूट मार्फत सर्वांसाठी उपलब्ध केला आहे. 'सर्व्हायव्हल कोर्स' हा शैक्षणिक दृष्ट्या राज्यभर ही लवकरच उपलब्ध होणार आहे. हे विशेष असून कोर्स च्या पहिल्या टप्प्यातील 'अॅडमिशन' प्रक्रियेला १ ऑक्टोबर पासून सुरूवात होत आहे. त्यामुळे ह्या विशेष 'सर्व्हायव्हल कोर्स' चा थेट फायदा हा असंख्य पर्यटक तसेच विद्यार्थ्यांना होणार आहे.
आजच्या काळात असा विशेष 'सर्व्हायव्हल कोर्स' प्रत्येकासाठी अनिवार्यच असून त्यांच्या आयुष्यात एक अतिशय महत्वाची संधीच ठरणार आहे. तर हा कोर्स वर्षभरात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा अश्या तिन्ही ऋतुत (सिझन) उपलब्ध असणार आहे. सोबत वेग -वेगळे विशेष 'चॅलेंजेंस्'चा देखील असणार आहे. ह्या सर्व्हायव्हल कोर्स मधे पहिल्या टप्प्यात 'बेसिक' कॅटेगेरीत प्रथम सहभागी होता येईल! तसेच ह्या 'सर्व्हायव्हल कोर्स'चे बेसिक ते अॅड्वान्स ++ असे विविध महत्वाचे टप्पे सुद्धा आहेत. यात एक दिवसीय ते पाच दिवसीय, अश्या कालावधीचा हा विशेष असा कोर्स सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. तर सहभागी तसेच कोर्स पूर्ण करणाऱ्यां व्यक्तींना त्यांच्या कौशल्य नुसार विशेष 'ग्रेड' सह प्रमाणपत्र व मेडलस् दिले जाणार आहे. ज्याचा उपयोग भविष्यातील करिअर संबंधीत व इतर संधी करिता अत्यंत उपयुक्त ठरेल!
दरम्यान, सर्व्हायव्हल कोर्स हा तसा प्रत्येकासाठी त्याच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा भागच आहे. सर्व्हायव्हल कोर्स तुम्हाला आजच्या युगात मानसिक, शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या आदीत महत्वपूर्ण भूमिका बजावत आत्मविश्वासनाने प्रत्येकाला पूर्ण सक्षम बनवते. तर सर्व्हायव्हल कोर्स करण्याचे अनेक फायदे आहेत. यात कोणत्याही खडतर परिस्थितीत जगने, आत्मविश्वास वाढवणे, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर परिस्थितीत जगायचे व त्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे ज्ञान मिळवणे, स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यास शिकणे, तान - तणाववातून मुक्त होने! आदी विविध महत्वाच्या बाबींचा समावेश होतो. तसेच याद्वारे सिंगल, जोडीने, कुटुंब व ग्रुप'ने सहभागी होत स्वतः सह नात्यांमधील बॉन्डिंग, विश्वास व क्षमता यांची पारक होऊनही तेही मजबूत बनतात. सोबत आताच्या धाव-पळीच्या युगात आपली मानसिक, शारिरिक तसेच कौशल्य'ची क्षमता सिद्ध करत आत्मविश्वासाने स्ट्रेस मुक्त होण्यास अतिशय मदतगारच. तर 'आंबोली जंगल सर्व्हायव्हल कोर्स द्वारा प्रत्येकाला आयुष्यात स्वावलंबी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. तर प्रत्येकाने आयुष्यात खडतर परिस्थितीत सुद्धा आपले सर्वात योग्य असे अस्तित्वच निर्माण करायचे असते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असते किंवा जंगलात साहस करत असते तेव्हा तेथे जगण्याच्या विशेष तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो. हे तुम्हाला त्यावेळीची परिस्थिती पाहण्यासाठी, अर्थ लावण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी मानसिक, शारीरिकदृष्ट्या आत्मविश्वास देते. सोबत स्वतःमधील कौशल्य याचीही पूर्ण पारख सह प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी मूलभूत ज्ञान हे असणे आवश्यकच आहे. त्यासाठी निर्णय राऊत व एनएसए अॅकॅडमी तथा इंस्टिट्यूट च्या तज्ञ यांच्या मार्फत खडतर परिस्थितीत तथा जंगलात तुम्हाला जगण्याच्या आवश्यक ते सर्व तंत्रे, योजना आणि पद्धती शिकवतील, तयार करतील आणि विशेष प्रशिक्षण देतील. त्यामुळे जगण्यासाठी संपूर्ण व्यावहारिक आणि सिद्धांतीक ज्ञान मिळाले तर यापेक्षा चांगले काय असू शकते. एकदा सदर कोर्स मधे तुम्ही सहभागी झालात की तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण व्हाल, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असाल आणि जंगलात टिकून राहण्यासाठी जलद निर्णय घेण्यास सोपे होईल!
एनएसए अॅकॅडमी तथा इंस्टीट्यूट मार्फतचा 'जंगल सर्व्हायव्हल कोर्स' हा पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्वरूपात असून एक दिवसीय व दोन दिवसीय असा उपलब्ध आहे. तर कोर्सचे पुढील ३, ४ व ५ दिवसीय असे टप्पे आहेत. यात पर्यटकांना तसेच इच्छुकांना सिंगल, जोडीने, कुटुंब तसेच ग्रुप स्वरुपात आपल्या वेळे नुसार 'जंगल सर्व्हायव्हल कोर्स' मधे सहभागी होता येणार आहे. तर सर्व शाळां व कॉलेजेस् च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आयुष्यात शैक्षणिक व करिअर दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा हा 'सर्व्हायव्हल कोर्स' असल्याने फक्त नाममात्र शुल्कात हा कोर्स हा निर्णय राऊत याने उपलब्ध केलेला आहे. तसेच कोर्स पूर्ण करणाऱ्यां प्रत्येकाला विशेष ग्रेड'सह प्रमाणपत्र व मेडलस् दिले जाणार आहे. तर सर्व्हायव्हल कोर्ससाठी बऱ्याच कॉलेज व शाळांनी आगावू नोंदणीला सुरूवात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील पहिल्या विशेष तयार करण्यात आलेला आगळा वेगळा अश्या 'सर्व्हायव्हल कोर्स' मधे सहभागी होण्याची संधी प्रथमच आंबोलीत उपलब्ध होत आहे. त्यामुळे असंख्य पर्यटक, विद्यार्थी यांना तर फायदा होणारच आहे. सोबत आंबोलीतील पर्यटन विकास, रोजगार निर्मिती यात महत्वाचे पाऊल ठरणार आहे.










