
सावंतवाडी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीने कंबर कसली आहे. नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी अध्यक्षपद भूषवले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख आणि जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
ही बैठक तब्बल पाच तास चालली, ज्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत, येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गाव आणि नगरपरिषदेतील प्रत्येक वॉर्डसाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. जिल्हा प्रभारी आबा दळवी यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुढील १५ दिवसांत सर्व ग्राम कमिट्या व वॉर्ड कमिट्यांच्या सर्व सेलच्या नियुक्त्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, त्या-त्या गावांमध्ये बैठका घेऊन त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रदेश काँग्रेसच्या वतीने बोलताना आबा दळवी यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत पूर्ण ताकदीने उभे राहण्याची हमी दिली. या बैठकीला सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर
अन्य पदाधिकारी ऍड. संभाजी सावंत, प्रकाश बांदेकर, सुधीर मल्हार, स्मिता टिळवे, आमिदी मिस्त्री, जास्मिन लक्ष्मेश्वर, कौस्तुभ पेडणेकर, आनंद कुंभार, विनोद मल्हार, अशोक लाटे, प्रतीक सावंत, सुनील सावंत, आबा मांजरेकर, कृष्णा धाऊसकर, प्रतीक्षा भिसे, माया चिटणीस, सत्यवान शेडगे, समीर भाट, शाहरुख खान, सुभाष नाईक, अभिजीत जाधव, संजय लाड, विल्यम सालदाना, हर्षवर्धन धारणकर, रफिया नाईक, ज्ञानेश्वर पारधी, शिवा गावडे, गुणाजी गवस, भाऊसाहेब देसाई, इसफास पिटो, अरुण नाईक, संतोष मडगावकर, विजय ओटवणेकर, रुपेश आईर, सुभाष दळवी, हरिश्चंद्र मांजरेकर, रमेश जाधव, सुमेधा सावंत, बासित पडवेकर, बाळासाहेब नंदीहळी, विभावरी सुकी, अभय मालवणकर, सुरेश निर्गुण, तवकीर शेख, गणेश मिरजकर, मायविन पिन्टो, संतोष तावडे, पीटर फर्नांडिस, संतोष कासकर, सिद्धेश मांजरेकर, आदी उपस्थित होते.










