
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा मंडलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिनच्या द्वारे चांगली सोय मिळत आहे ही सेवा तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुरू केली होती. याच ठिकाणी रुग्णांना फळे व बिस्किटे वाटून कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद कमत, जिल्हा उपाध्यक्ष श्वेता कोरगावकर महिला जिल्हाध्यक्ष महेश धुरी आदी उपस्थित होते.










