
सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप बांदा मंडळातर्फे इन्सुली गावातील शालेय विद्यार्थ्यांना 'कल्पवृक्ष' रोपे वाटून एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. 'राष्ट्र प्रथम, नंतर संघटन, नंतर मी' हा रवींद्र चव्हाण यांचा मंत्र आत्मसात करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात एकूण २२५ कल्पवृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बांदा मंडळाने रोणापाल येथील दयासागर छात्रालयाच्या वसतिगृहाला एक दूरचित्रवाणी संच भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजपचे स्थानिक पदाधिकारी प्रमोद कामत, महेश धुरी, उमेश पेडणेकर, मधुकर देसाई, राजन देसाई, योगेश केणी, राकेश केसरकर, प्रताप सावंत, महादेव गावडे, संजय सावंत आणि बांदा मंडळ अध्यक्ष आणि स्वागत नाटेकर उपस्थित होते. तसेच, ज्येष्ठ पत्रकार श्रीमती मंगल कामत, रोणापाल छात्रालयाचे संचालक जीवबा वीर, औदुंबर पालव, रवी परब, शैलेश पालव, सचिन दळवी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम श्री. चव्हाण यांच्या विचारांना पुढे नेणारा आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारा ठरला, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.










