निगुडे माऊली मंदिरात नवरात्रौत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन

Edited by:
Published on: September 21, 2025 11:31 AM
views 187  views

सावंतवाडी :  निगुडे गावची ग्रामदैवत देवी माऊली मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी देवीची विधिवत पूजा व घटस्थापना दुपारी ०१:०० महाप्रसाद, महाआरती व रात्री स्थानिक ग्रामस्थांची भजने, दुसरा दिवस रात्रौ ०९:०० श्री  स्वामी माऊली दशावतार नाट्य मंडळ डोंगरपाल यांचा दणदणीत नाट्यप्रयोग, तिसरा दिवस रात्रौ ०८:०० नामांकित फुगडी व रात्रौ ०९:०० बुवा श्री.सत्यनारायण कळंगुटकर यांचे भजन, चौथा दिवस रात्रौ ०९:००  स्वतः मालक बाबी कलिंगण कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरुर यांचा दणदणीत नाट्यप्रयोग ,पाचवा दिवस रात्रौ ०९:०० महिलांचे भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम, सहावा दिवस रात्रौ ०८:०० महिलांची महाआरती, सातवा दिवस रात्रौ ०९:०० श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ,निगुडे यांचा दणदणीत नाट्यप्रयोग,आठवा दिवस रात्रौ ०९:००  श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा दणदणीत नाट्यप्रयोग नववा दिवस गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, दहावा दिवस रात्री ८:०० भव्य दिव्य दांडिया नवरात्री खास आकर्षण म्हापसा-गोवा  असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

दररोज दुपारी महाप्रसाद, होणार असून ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा, देव देवतांचे विवाह सोहळा,ओटी भरणे,व सायंकाळी देव पाहुणचार असे कार्यक्रम होणार तरी सर्व भाविकांनी सदर कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन देवी माऊली नवरात्रौत्सव समिती निगुडेच्या वतीने करण्यात आले आहे.