गेळेत आरोग्य शिबिराला प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: September 20, 2025 18:46 PM
views 94  views

सावंतवाडी : गेळे ग्रामपंचायत आणि आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गेळे गावात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेळे ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन गेळे सरपंच सागर ढोकरे यांच्याहस्ते करण्यात आले. 

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गेळे उपसरपंच विजय गवस, आंबोली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेश जाधव, डॉ पाटील, गेळे ग्रामपंचायतीच्या सदस्या रीना गवस, संध्या गवस, सुनयना गावडे, गेळे पोलीस पाटील दशरथ कदम, गेळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत, सुनिल गावडे, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका व गेळे ग्रामस्थ उपस्थित होत्या. या शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, गर्भाशय तपासणी, तोंडाची तपासणी, स्थानाची तपासणी, टेली मेडिसिन अंतर्गत सल्ला व उपचार, तसेच एचएलएल अंतर्गत रक्त व लघवी तपासणी, एच बी तपासणी, शुगर तपासणी, वय वंदना कार्ड काढणे, आयुष्यमान भारत कार्ड काढणे, आभा कार्ड काढणे, दिव्यांगांकरिता यूआयडी कार्ड काढण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले. या शिबिराच्या आयोजनाबाबत गेळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेश जाधव, सूत्रसंचालन सुहास गावडे तर आभार सरपंच सागर ढोकरे यांनी मानले.