
सावंतवाडी : भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळातर्फे यंदाही मोठ्या उत्साहात नवदुर्गेचे आगमन करण्यात आले. या सोहळ्यासाठी भटवाडी परिसर तसेच सावंतवाडीतील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष दीपक सावंत, दिलीप भालेकर, कुणाल शृंगारे, संजू शिरोडकर, रघु धारणकर, भार्गव धारणकर, शुभम सावंत, विजय सावंत, प्रसाद परब, भरत परब, अभिनंदन राणे, संतोष खंदारे, गौरव रामाणे, राजा दळवी, शेखर प्रदीप भालेकर, ललित नाईक, चंदन नाईक, स्वप्निल कमते, शेखर शिंदे, बाळा कावळे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. यावर्षीचा नवरात्रोत्सव हा पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मातेच्या आगमनाने भटवाडी परिसरात चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.