सामाजिक बांधिलकीकडून पालकमंत्र्यांचे आभार

Edited by: विनायक गांवस
Published on: September 08, 2025 12:27 PM
views 315  views

सावंतवाडी : कोलगाव आयटीआय समोरील जुन्या हायवेवर पडलेला चर तात्काळ बुजवल्याबद पालकमंत्री नितेश राणे व बांधकाम विभागाचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून आभार मानले आहेत. 

सावंतवाडी कुडाळ जुन्या हायवेवर कित्येक दिवसापासून खूप मोठा चर पडला होता. तो चर बुजवण्याचे काम मंद गतीने सुरू आहे. या हायवेवर कोणाचा अपघात होऊ नये, या कारणास्तव सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.‌ तर कोकणसादने हा मुद्दा उचलून धरला होता. याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतल्यानंतर तो चर तात्काळ बुजवण्यात आला. त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला असुन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानण्यात आले.