सावंतवाडीत उत्साहात ११ दिवसांच्या गणरायाला निरोप

Edited by: विनायक गांवस
Published on: September 07, 2025 13:50 PM
views 194  views

सावंतवाडी : शहरासह ग्रामीण भागातील ११ दिवसांच्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत वाजत गाजत निरोप देण्यात आला. गणेशभक्तांच्या जल्लोषात ठिकठिकाणी थाटामाटात विसर्जन करण्यात आले.

शहरात ११ दिवसांच्या गणपतींचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चितार आळी व नगरपरिषद व्यापारी संकुल येथील सार्वजनिक गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी साकारण्यात आलेले आकर्षक चलचित्र देखावे खास आकर्षण ठरले. ढोलपथक, महिला व युवकांच्या कार्यक्रमांनी विसर्जन मिरवणूकीच लक्ष वेधलं होत. घरगुती गणपतींना देखील फटाक्यांच्या आतषबाजीसह  वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला.  गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा जय घोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेत जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही बाप्पांच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. तलाव, नदी, ओहोळ आदी ठिकठिकाणी गणेश मुर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणरायांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.