
सावंतवाडी : येथील गरड परिसरात काल रात्री पावणे बाराच्या सुमारास रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली असून यात रिक्षाचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीसांनी दाखल होत पुढील कार्यवाही सुरू केली.










