
सावंतवाडी : कुडाळ - मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सावंतवाडीतील घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मडूरा तसेच सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांच्या गावडेंचा राजा विघ्नहर्त्याचे त्यांनी दर्शन घेतले. तालुक्यातील इतरही घरगुती गणपतींचे त्यांनी दर्शन घेतले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, झेवीयर फर्नांडिस, बंटी पुरोहीत, सत्यवान बांदेकर, क्लॅटस फर्नांडिस, दत्ताराम परब आणि बाळू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. गावडेंचा राजा या नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्त्याच्या चरणी सीताराम गावडे यांनी आमदार निलेश राणे यांच्या उज्ज्वल राजकीय वाटचालीसाठी साकडे घातले.










