
सावंतवाडी : मुंबईच्या माहीम मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेमळे येथील निवासस्थानी विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आ. सावंत यांच्या सौभाग्यवती, त्यांचा सुपुत्र सार्थक सावंत, वामन गाड, रूपेश राऊळ व राऊळ परिवारातील सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी आमदार महेश सावंत यांचे स्वागत सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले. आ. सावंत यांनी रुपेश राऊळ यांचे वडील गुरुनाथ राऊळ, काका महादेव राऊळ, भाऊ तुषार राऊळ व रुपेश राऊळ यांचे सुपुत्र आर्यन राऊळ यांच्याशी सुसंवाद साधला.