
सावंतवाडी : संस्थानकालीन किमान शंभर वर्षाहून अधिक काळ बांधकाम करण्यात आलेली मुख्य भिंत शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास कोसळली आहे. याच भिंतीवर काही महिन्यांपूर्वी नवीन बांधकाम करण्यात आलं होत. गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. अशाच परिस्थितीत हि भिंत कोसळली. दरम्यान, उर्वरित राहिलेल्या भिंतीलाही धोका निर्माण झाला असून ती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.