अल्ट्रा मॅरेथॉन जिंकून कबीरने केलं बर्थडे सेलिब्रेशन

Edited by: विनायक गांवस
Published on: June 30, 2025 18:36 PM
views 102  views

सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विध्यार्थी कु. कबीर हेरेकर याने आपला नववा वाढदिवस आजरा कोल्हापूर येथे पार पडलेल्या चितरी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा जिंकून साजरा केले.

२९ जून रोजी आजरा कोल्हापूर येथे चितरी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सावंतवाडी येथील कबीर हेरेकर याने ५ किलोमीटर ज्युनिअर कॅटेगरी मध्ये सहभाग घेत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे काल कबीर चा ९वा वाढदिवस असून ही त्याची ३४वी मॅरेथॉन स्पर्धा होती. कबीरला प्रशस्तीपत्र, मेडल व विजय चिन्ह देऊन गौरविण्यात आले.