'मदर क्वीन्स'च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला रंगांचा कलाविष्कार..!

Edited by: विनायक गांवस
Published on: June 28, 2025 17:21 PM
views 62  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये शनिवारी 'अम्ब्रेला पेंटिंग' ऍक्टिव्हिटी  आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने व मान्यवरांच्या स्वागताने झाले. 

या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते नववीची मुले सहभागी झाली होती. फॅब्रिक कलर्सचा वापर करून प्लेन छत्रीवर कॅलिग्राफी आर्ट आकर्षक पद्धतीने साकारण्यात आली. यात पावसाची बडबड गीते, घोषवाक्य, सुंदर विचार ,निसर्ग चित्रे रेखाटण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी मुक्त हस्ताने रंगांच्या छटा पसरवून रंगबिरंगी नक्षीकाम सुंदररीत्या साकारले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पानाफुलांच्या नक्षीकामाने, निसर्गातील विविध आकारांच्या चित्रांनी तसेच शालेय विषयासंदर्भातील बोधचिन्हे देखील कुंचल्याने रेखाटून छत्र्यांचे सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाल्याने सर्व मुलांना अप्रतिम कलाविष्काराचा अनुभव आनंदाने घेता आला.यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना बी.एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे प्राचार्य उदय वेळे, प्रा. तुकाराम मोरजकर, प्रा.आत्माराम शिरोडकर ,प्रा.सिद्धेश नेरुरकर या कला तज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच फाईन आर्ट कॉलेजचे विद्यार्थी लखन पाटील, ऋतुजा कानडे ,स्वरांगी रानडे, मृदुला ठाकूर ,ऋतुजा सुतार , विष्णुप्रसाद सावंत यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अनुजा साळगावकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी कलाशिक्षक कुलदीप कालवणकर ,सहाय्यक शिक्षिका श्रीम.अस्मिता परब  यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अमिना शेख  यांनी केले.

सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत ,मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.