रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 24, 2025 12:05 PM
views 93  views

कणकवली : रोटरी ही जागतिक स्तरावर समाजातील लोकांसाठी काम करणारी सेवाभावी संस्था असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे रोटरी क्लब ऑफ खारेपाटण ची नव्याने  स्थापना होत आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान असून या क्लब चे काम जिल्ह्यात आदर्शवत ठरेल असे भावपूर्ण उदगार रोटरी क्लबचे डीस्ट्रिक ऑफ गव्हर्नर डॉ.शरद पै यांनी खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या पद अधिकार ग्रहण सोहळ्यात बोलताना काढले.

या कार्यक्रमाचे उद्घघाटन डॉ.शिरीष पै यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून तर शालेय विद्यार्थीनी कु.अनुश्री तळगावकर हिच्या शिव नृत्याने करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष श्री प्रशांत गुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रोट्रियन फर्स्ट लेडी श्रीम.पद्मजा पै.,रोटरी चे जिल्हा सचिव राजेश घाटवळ,प्रणय तेली, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, डॉ.विद्याधर तायशेटे,महादेव पाटकर 

संजय रावराणे,खारेपाटण माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे ,खारेपाटण सिनियर कॉलेज प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,खारेपाटण हायस्कूल मुख्याद्यापक श्री संजय सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या प्रेसिडेंटपदी रोट्रियन श्री दयानंद बंडू कोकाटे व सेक्रेटरी पदी रोट्रियन श्री अजय गुरसाळे तर ट्रेझरियनपदी रोट्रियन श्रीम.सारिका महिंद्रे यांची सर्वानुमते निवड करून त्यांचा त्यांच्या पदाचा अधिकार सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. यावेळी खारेपाटण रोटरी क्लब च्या २५ मेंबर्स ना देखील रोट्रियनव पदवी देऊन गौरविण्यात आले.तसेच या कार्यक्रमात खारेपाटण येथील रहिवासी श्री राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी सौ वीणा राजेंद्र ब्रम्हदंडे यांच्या मृत्यू नंतर देहदान करून समजला एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल त्याच्या कुटंबियाचा रोटरी क्लब च्या वतीने डॉ.शिरीष पै यांचे शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच खरिओतन हायस्कूलच्या विद्यार्थी रेवण राऊळ याने देखील शालेय स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्याचा देखील रोटटी क्लब च्या वतीने गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ.शिरीष पै पुढे म्हणाले तुम्ही आता जागतिक संघटनेशी जोडले गेला असून रोटरी मध्ये लीडरशिप,फ्रेंड्सशिप,इंटीग्रिटी व सर्व्हिस याबरोबरच शिस्त महत्वाची आहे.प्रोटोकॉल प्रमाणे प्रत्येकाने काम केले पाहिजे.इथे प्रत्येकाला काम करण्याची संधी आहे.तुम्ही दिलेला पैसा हा समाज हीतासाठीच वापरला जाणार असून रोटरी हे एक मजबूत संघटन असल्याचे तुमच्या कार्य कर्तुत्वाने दाखवून द्या. " खारेपाटण रोटरी क्लब च्या अध्यक्षपदी माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजत असून आपण मला जनतेची एकप्रकारे सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन भविष्यात खारेपाटण रोटरी क्लब ला यशाच्या शिखरावर नेणार असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे नूतन अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी रोट्रियन श्री संजय रावराणे,डॉ.विद्याधर तायशेटे,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,श्री महादेव पाटकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तर PHG मध्ये चांगले काम केल्याबद्दल वैभववाडी रोटरी क्लब च्या ७ तर देवगड रोटरी क्लब च्या ४ रोट्रीयन चा डीस्ट्रीक गव्हर्नर डॉ शिरीष पै यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव  करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हाभरातून सर्व रोटरी सदस्य व खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री विद्याधर सावंत यांनी केले.तर प्रमुख पाहुण्यांची ओळख स्नेहल खांबल यांनी करून दिली. प्रास्ताविक प्रशांत गुळेकर यांनी केले. तर सर्वांचे आभार रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे सेक्रेटरी श्री अजय गुरसाळे यांनी मानले.