माडखोल विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी भिकाजी जाधव

Edited by: विनायक गांवस
Published on: June 23, 2025 19:36 PM
views 64  views

सावंतवाडी : माडखोल विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी भिकाजी जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. सोमवारी सकाळी निवडणूक अधिकारी सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोसायटीच्या खास बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सोसायटीचे चेअरमन कृष्णा उर्फ जीजी राऊळ, संचालक प्रकाश नाईक, संजय राऊळ, प्रकाश नाईक, सुरेश आडेलकर, नंदू दळवी, जनार्दन लातये, संतोष मेस्त्री भाऊ कोळंबेकर, सौ द्रौपदी राऊळ, सौ रंजिता चव्हाण, गट सचिव सौ गौरी रेडकर, लिपीक नागेश मेस्त्री उपस्थित होते. प्रकाश नाईक यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. दरम्यान माडखोल देवस्थानचे प्रमुख मानकरी व गाव विकास संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम तुकाराम राऊळ, देवस्थानचे मानकरी सखाराम राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, बाळु शिरसाट आदींनी भिकाजी जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.