
सावंतवाडी : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशास गवसणी घालून शाळेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. इयत्ता पाचवीतून कु. सारा सुहेल नाईक व इयत्ता आठवीतून कु.विभव विरेश राऊळ आणि कु. मानसी परमेश्वर सावळे हे विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत. गणित मंडळाद्वारे नियोजित गणित अधिवेशनात प्रशालेच्या या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत ,डॉक्टर सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.