एसपीकेचे प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांची आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेसाठी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: June 20, 2025 17:26 PM
views 81  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. एस व्ही पाटील यांची दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्र्टीय विज्ञान परिषदेसाठी निवड झालेली आहे. "कॅडमियम हायड्रॉक्साइड: विविध सीडी-आधारित मटेरियल्ससाठी एक बलिदानाचा साचा" (आयडी: AMSCA-163) शीर्षकाचा  सारांश "प्रगत मटेरियल्स संश्लेषण, वैशिष्ट्यीकरण आणि अनुप्रयोगांवरील पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत" (AMSCA-2025) तोंडी सादरीकरणासाठी त्यांची निवड झालेली आहे. ही विज्ञान परिषद सुंगक्युंकवान विद्यापीठ 

(SKKU), सुवोन, दक्षिण कोरिया येथे २५ ते २७ जून २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्र्टीय परीषदेमध्ये रीसर्च पेपर सादरिकरण व ज्ञान आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले ,राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एल भारमल यांनी अभिनंदन केले आहे.