
सावंतवाडी : संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नवोगतांच्या आगमनाने वातावरण चैतन्यमय झाले होते. दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय डॉ. शेखर जैन तसेच संचलित प्रशाला संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर यांनी मुलांचे पुष्प व मिठाई देऊन तोंड गोड करून स्वागत केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.