
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गनगरी या संस्थेने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त राबविलेले उपक्रम वाखाणण्याजोगे व अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन उपनिबंधक सहकारी संस्था जिल्हा सिंधुदुर्गचे अधीक्षक श्रीकृष्ण मयेकर यांनी केले. संस्थेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त विविध उपक्रम राबविले होते.त्यापैकी खुल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचे बक्षीस वितरण समारंभ प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या प्रधान कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील कै. द.सि.सामंत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त संजय बांबुळकर, द्वितीय क्रमांक प्राप्त संतोष वारंग,तृतीय क्रमांक प्राप्त निता सावंत,उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त सतीश कदम व कृष्णा साळी यांना गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष ऋतुजा जंगले,उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे अधीक्षक श्रीकृष्ण मयेकर, संचालक सर्वश्री संतोष मोरे,नारायण नाईक,संतोष राणे,श्रीकृष्ण कांबळी,मंगेश कांबळी,सीताराम लांबर,सचिन बेर्डे,संजय पवार,महेंद्र पावसकर,समीक्षा परब,तज्ज्ञ संचालक किशोर कदम,संघटना प्रतिनिधी विठ्ठल गवस,तुषार आरोसकर,बाबाजी झेंडे,विवेक माईणकर,समीर जाधव,निलेश ठाकूर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराधा माईणकर,संयोजन अकौंटट मनोज सावळ, संगणक तज्ज्ञ समीर नातू यांनी केले. शेवटी आभार उपाध्यक्ष ऋतुजा जंगले यांनी मानले.