ग्राहक पंचायत सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 15, 2025 18:07 PM
views 85  views

सावंतवाडी : ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली संस्था म्हणजेच ग्राहक पंचायत. या संस्थेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी  अमोल केसरकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

सावंतवाडी येथील बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा सल्लागार अँड. समीर वंजारी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा. रूपेश पाटील, सहसंघटक प्रमोद मोहिते, जिल्हा संघटक विष्णूप्रसाद दळवी, सुकन्या टोपले, स्वप्नील लात्ये, प्रताप सावंत, देवेंद्र नाईक, दत्ताराम नाईक, विनायक गांवस, साबाजी परब आदी उपस्थित होते. यावेळी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन. तसेच लवकरात लवकर तालुका संघटनेच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करून ग्राहकांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू, असे आश्वासन नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री. केसरकर यांनी दिले आहे.