राज ठाकरेंच्या वाढदिनी एक हजार रोपांचं वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: June 15, 2025 17:27 PM
views 54  views

सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत मोफत एक हजार झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे तर्फे दरवर्षी एक हजार झाडांच्या रोपांची लागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात येते. 

त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम सावंतवाडी शहरात राबविण्यात आला. दरम्यान तालुक्यात अनेक ठिकाणी समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहराध्यक्ष अँड राजू कासकर, बांदा तालुका अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, तालुका सचिव सतिश आकेरकर,काशीराम गावडे, श्रीराम सावंत, अभिमन्यू गावडे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.