जुन्या पंचायत समितीची संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता..?

Edited by: विनायक गांवस
Published on: June 09, 2025 17:12 PM
views 157  views

सावंतवाडी : जुन्या पंचायत समितीची संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे. ती केव्हाही मुख्य रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तात्काळ पंचायत समिती प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन ती धोकादायक भिंत काढून टाकावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

तो संरक्षक कठडा धोकादायक झाला असून तिरका झाला आहे. त्यामुळे कधीही कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. परिसरात शाळेची मुले अन्य स्थानिक प्रवासी महिला मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने दखल घेवून तो संरक्षक कठडा तोडावा अशी मागणी होत आहे.